चाळीसगावात उद्या परदेशी राजपूत उन्नती मंडळाची सभा : गुणवंतांचा होणार गौरव
Meeting of Pardeshi Rajput Unnati Mandal tomorrow in Chalisgaon : Merits will be honored चाळीसगाव : परदेशी-राजपुत उन्नती मंडळ, चाळीसगाव या संस्थेची सभा रविवारी दुपारी 12 वाजता राजपुत मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर चाळीसगाव येथे होत आहे. ही आमसभा संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
विविध विषंयावर चर्चा , गुणवंतांचा होणार गौरव
या आमसभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहेत. यात मागील वार्षीक सभेचे प्रोसेडींग वाचून मंजूर करणे, 2022, 2023 अखेर झालेल्या खर्चास व आर्थिकपत्रकास मंजुरी देणे, 2023, 2024 अखेर अंदाजपञक वाचुन मंजूर करणे, 2022, 2023 च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, 2023, 2024 साठी वैधानिक सनदी लेखा परीक्षकाची नेमणूक करण तसेच समाजातील गुणवान, हुशार विद्यार्थ्यांचा, मान्यवरांचा सन्मान करणे, सन 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीबाबत विचार करणे. यासह समाजाच्या अडीअडचणी, समस्या आदी विषयांवर चर्चा विनीमय करण्यात येणार आहे. दहावी, बारावी परीक्षेमध्ये मध्ये 80 टक्क्ंयांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्यांचा तसेच शासनाच्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी मान्यवरांचा या आमसभेत सत्कार करण्यात येणार आहे.
आपली संपूर्ण माहिती डॉ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या लक्ष्मीनगर चाळीसगाव 02589, 222622 या पत्त्यावर 5 ऑगस्ट 2023 च्या आत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजबांधवांनी या आमसभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन परदेशी, राजपुत उन्नती मंडळ चाळीसगाव अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डॉ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, खजिनदार सतीष रघुनाथ परदेशी, संचालक हिरालाल पुनमचंद परदेशी, संचालक सुरेश अमरसिंग परदेशी, संचालक डॉ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, संचालका डॉ.सुशीला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश जयसिंग राजपूत आदींनी केले आहे.
