चक्क 407 पिकअप वाहनांमधून वाळू चोरी : यावल पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Sand theft from 407 pick-up vehicles : Yaval police registered a case against three यावल : चोपडा रस्त्यावरील चुंचाळे गावाच्या फाट्याजवळ एका 407 पिकअप वाहनातून थेट वाळू चोरी करून नेली जात असल्याचा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निर्दशनास आला. वाहनाची मागील बाजू पूर्णपणे झाकलेली असल्याने संशय आल्यने तपासणीत त्यात चोरीची वाळू मिळुन आली. ाहन चालकाकडे याबाबतचा परवाना नसल्याने यावल पोलिसात तीन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन जप्त करण्यात आले आहे.

कारवाईने उडाली खळबळ
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चुंचाळे फाटा आहे. चोपडा रस्त्यावरील या चुंचाळे फाट्याजवळ यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार सुशील घुगे, रोहील गणेश आदी पथक गस्तीवर होते. गस्तीदरम्यान यांना 407 पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.04 जी.सी. 2423) जातांना दिसले व हे वाहन मागील बाजुने पूर्णपणे झाकून पॅक केलेले होते म्हणून पोलिसांच्या पथकास संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात वाळू आढळली मात्र परवाना नसल्याने वाळू चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून विशाल एकनाथ सपकाळे, शुभम रवींद्र कोळी व मुकुंद संजय सैंदाणे सर्व (कानळदा) या तीन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !