बेसिक पोलिसिंग भर ; गुन्हेगारीचा बीमोड करणार ; भुसावळ बाजारपेठचे नूतन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड


Basic policing emphasis ; will prevent crime ; Baban Awad, the new police inspector of Bhusawal market भुसावळ : शहरातील गुन्हेगारीचा निश्चितपणे बीमोड करण्यात येईल तसेच बेसिक पोलिसिंगवर आपला भर असेल, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी रविवारी दुपारी पदभार घेतल्यानंतर ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

पोलीस दलाचा नावलौकीक वाढवणारी कृती करणार
आव्हाड म्हणाले की, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी कारवायांना पूर्णपणे पायबंद लावण्यात येईल तसेच पोलीस दलाचा नावलौकीक वाढेल, अशीच कृती आपल्या कामातून जनतेलाही दिसेल, असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी कृती करणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी केला सत्कार
भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व भुसावळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप वराडे व भूषण भंगाळे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !