साकेगावातील किराणा दुकानातून एक लाख 30 हजारांची रोकड लंपास
One lakh 30 thousand in cash was stolen from a grocery store in Sakegaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील किराणा दुकानातून चोरट्यांनी तब्बल एक लाख 30 हजारांची रोकड लांबवल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खिडकीची जाळी तोडून केला प्रवेश
सोपान रामा बाविस्कर (38, एमआयडीसी, श्रीरामनगर, साकेगाव, ता.भुसावळ) यांचे सदगुरू प्रोव्हीजन आहे. चोरट्यांनी 31 रोजी मध्यरात्रीनंतर बंद दरवाजावरील खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला व घराबाजूलाच असलेल्या किराणा दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाख 30 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात रविवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.








