बँकेतून बोलत असल्याचा फोन आल्यास ग्राहकांनो सावधान ! महिलेला साडेआठ लाखांचा गंडा


If you get a phone call from the bank, beware ! Eight and a half lakhs to the woman जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सायबर चोरटे विविध क्लृप्त्याही लढवत असल्याचा प्रत्यय फसवणूक झालेल्या ग्राहकांना येत आहे. बँकेच्या कस्टमर केअर बोलत असून तुमची गेलेली रक्कम तुम्हाला परत मिळवून देतो. असे सांगत एरंडोल येथील महिलेला वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या बँक खात्यातून साडेआठ लाखांची रक्कम वळवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन ठगांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधला !
एरंडोल येथील रहिवासी असलेल्या शर्मिला चिकाटे या नोकरीला असून शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी त्यांच्याशी ऑनलाईन ठगांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर केअरमधून बोलत आहेत. या बँकेची गेलेली रक्कम तुम्हाला मिळवून देतो. यासाठी त्यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर कस्टमर सपोर्ट एपीके, कम्प्लेन रजिस्टर एपीके व एनीडेस्क या अ‍ॅप्लिकेशनची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले व दरम्यान त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करीत या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेच्या मोबाईलचा एक प्रकारे ताबा घेत कॅनरा बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती चोरुन घेतली.







चोरलेल्या माहितीच्या आधारे घातला गंडा
महिलेने अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यातून चोरलेल्या माहितीच्या आधारावर सायबर ठगांनी शर्मिला चिकाटे यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून आठ लाख 55 हजार 41 रुपये ऑनलाईन काढून घेत त्यांना गंडविले. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच शर्मिला चिकाटे यांनी लागलीच सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !