टाकरखेडाजवळ तापी नदीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला


The body of an unidentified youth was found in the Tapi river near Takarkheda
यावल :
यावल तालुक्यातील टाकरखेडा जवळील शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाच्या हातावर त्रिशूल गोंदलेले असून अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

ओळख पटवण्याचे आवाहन
टाकरखेडा, ता.यावल येथील तापी नदीवर असलेल्या शेळगाव बॅरेज पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह नागरीकांना दिसून आला. त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी, निलेश वाघ, विनोद चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परीसरातील नागरीकांना माहिती दिली व ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मयत तरुणाच्या हातावर त्रिशूल गोंदलेले असून याबाबत सर्वत्र माहिती देण्यात आली मात्र अद्यापही या तरुणाची ओळख पटली नाही. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे घटनास्थळीच मयताचे शवविछेदन करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !