जिद्द , मेहनत व संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली : दीपाली सूर्यवंशी


Persistence, hard work and struggle are the keys to success : Deepali Suryavanshi
भुसावळ :
जिद्द, संघर्ष, मेहनतीमुळे कुठलेही यश संपादन करू शकतो. गरीबी हा कलंक नाही तसेच अभ्यासातील सातत्यामुळे तुम्ही निश्चितच यशोशिखर गाठाला, असा आशावाद माजी विद्यार्थिनी तसेच नूतन पोलीस उपनिरीक्षक दीपाली निंबा सूर्यवंशी यांनी येथे व्यक्त केला. दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सोमवारी गुणवंतांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन ए.एन.शुक्ल होते. प्रमुख पाहुणे आमदार सुरेश दामू भोळे, सा.शि.सं. सेक्रेटरी बी.जी.सरोदे, संचालक जे.एच.चौधरी, हेमंत जे.चौधरी, शालेय समिती सदस्य डॉ.के.जी.झांबरे, व्ही.एम.महाजन, सागर एच.चौधरी, संजय बी.पाटील, एस.आर.झांबरे, दीपक जे.चौधरी आदी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमात दहावीत प्रथम आलेल्या नेहा नामदेव गायकवाड, द्वितीय- रुद्र सौरस पाटील, तृतीय- जयेश विनोद पाटील, मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम् आलेल्या सौरव अनिल सोनवणे, द्वितीय- पियुष राजू इंगळे, मागासवर्गीय मुलींमध्ये प्रथम आलेल्या दिव्या रवींद्र सोनवणे यांना गौरवण्यात आले तसेच विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आमदार सुरेश दामू भोळे यांच्याकडून विद्यालयाला 400 पुस्तके भेट देण्यात आली.

डॉ.के.जी.झांबरे सर म्हणाले की, वाचाल तर वाचाल! वाचनाविषयीचे महत्व समजावून सोबतच सुप्त गुणांचा विकास करावा. दहावीतील प्रथम नेहा गायकवाड हिने मनोगत व्यक्त केले. ए.एन.शुक्ल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यास नक्कीच यश प्राप्त होते. सूत्रसंचालन आर.व्ही.महाजन तर आभार एम.एन.गुरचळ यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !