सावद्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : संस्था चालकांसह चौघांविरोधात गुन्हा


Rape of a minor girl in Savada: Crime against four persons including the institution’s driver सावदा : शहरातील एका शाळेतच 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना 3 रोजी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नकाब देण्याच्या बहाण्याने विनयभंग
अल्पवयीन पीडीतेच्या तक्रारीनुसार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित तथा संचालक अकरम खान अमानुल्ला खान यांनी नकाब देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये माप घेण्याचे कारण दाखवून बोलावत विद्यार्थिनीच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला.







शिक्षकांनी दाबली घटना
या कृत्यानंतर भेदरलेल्या विद्यार्थिनीने वर्ग शिक्षक फिरोज खान यांच्यासह शेख अर्शद यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान खान यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिघांनी बालिकेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ही घटना कुणालाही सांगू नये, असे तिला सांगितले. यामुळे ही बालिका खूप घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही. यावरून तिच्या आईने विचारणा केली असता या विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्याने या घटनेची वाच्यता झाली. यानंतर मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस स्थानकात धाव घेतली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी शाळेचे संचालक अकरम खान अमानुल्ला खान (रा.रजा नगर, सावदा) यांच्यासह इरफान खान जमशेर खान (रा.रजा नगर, सावदा), शेख फिरोज खान सुपडू तसेच शेख अरशद शेख सर्दद (सावदा) या चौघांच्या विरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !