भुसावळात दहा क्रीडा प्रकारात होणार शासकीय क्रीडा स्पर्धा
भुसावळ : क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व भुसावळ तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमानाने अशासकीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भुसावळ तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे होते. यावेळी भुसावळ तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, महाराष्ट्र राज्य शारीरीक शिक्षक-शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, भुसावळ तालुका समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, के.नारखेडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमण भोळे, ई.ब.टा.संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर, मुख्याध्यापिका यामिनी सोनवणे, अपर्णा राजपूत, थ्रो बॉल संघटनेचे सचिव प्रा.अशोक निकम व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका समन्वयक आर.बी. कुलकर्णी यांनी केले.
दहा क्रीडा प्रकारात होणार स्पर्धा
भुसावळ तालुकास्तरीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉलीबॉल, मैदानी स्पर्धा, कॅरम, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल अशा दहा खेळांच्या विविध वयोगटांनुसार (14, 17, 19,) स्पर्धा घेण्याचे ठरले. तालुका क्रीडा अधिकारी मीलन मीनल थोरात यांनी स्पर्धांचा आयोजन कशा पद्धतीने होईल याची माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाय किशोर वायकोळे यांनी सर्व शाळांनी सर्व स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी सहभागी करून घ्यावे, स्पर्धेच्या वेळी क्रीडा शिक्षकांना मुख्याध्यापकांनी स्पर्धेसाठी सोडावे व शासकीय कामास सहकार्य करावे, असे आवाहन करीत त्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र देण्यात येईल, अशी माहिती दिी.
आयोजन समिती गठीत
तांत्रिक समितीचे अध्यक्ष- गटशिक्षणाधिकारी किशोर वायकुळे, सचिव- तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, सहसचिव, क्रीडा समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, सदस्य डॉ.प्रदीप साखरे, रमण भोळे, आर.आर.धनगर, डी.आर. धांडे, प्रा.अशोक निकम, प्रा.मनोज वारके, विलास पाटील, यामिनी सोनवणे. सूत्रसंचालन ताप्ती पब्लिक स्कूलचे अकबर यांनी तर आभार विजय सनकत यांनी मानले.
