गोंडगावातील घटनेचा निषेध : भुसावळात सकल मराठा समाजाचा मोर्चा


भुसावळ : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृन हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ संशयीताला फाशी द्यावी, अशी मागणी करीत निषेधाचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे आणि राजेश्री संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

तर तीव्र आंदोलन
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना निषेधार्थ असून या प्रकरणातील संशयीत स्वप्निल पाटील याला अटक केली असून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, हा खटला अतिजलद न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणातील संशयीताला फाशी झाली नाही तर समाजातर्फे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. निवेदनावर भानुदास पाटील, अंबादास मराठे, विलास पाटील, प्रमोद पाटील, उज्वला पाटील, प्रतिभा मराठे, रूपाली पाटील, अंजनाबाई पाटील, भारती पाटील, शोभा महाजन, माधुरी पाटील, शीतल मराठे आदी महिला, पुरूष निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात उपस्थित होते.

राजेश्री संघमित्रा फाउंडेशनतर्फे निवेदन
भुसावळ : राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन देवून गोंडगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. राज्यात दिवसेंदिवस महिला, मुलींवरील अत्याचारात वाढ होत असून या घटना रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी गरीत गोंडगाव घटनेतील आरोपीला कडक शासन करावे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे, सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे, सुजाता सपकाळे, सुरेखा ठाकुर, उज्ज्वला बागुल, अ‍ॅड.प्रतिमा अग्रवाल, चांद तडवी, वंदना सोनवणे, छाया बाविस्कर, दीक्षा लोखंडे, छाया चौधरी, आशू लोखंडे, वंदना सोनवणे, आम्रपाली किन्नर यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !