धावत्या ट्रकमधून पाच लाखांचे किटकनाशक लांबवले
Pesticides worth five lakhs were extended from a running truck रावेर : धावत्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडून सुमारे पावणे पाच लाखांचे किटकनाशकांचे बॉक्स लांबवल्याची धक्कादायक घटना लालमाती गावाजवळील कुसूंबा गावाजवळील दोन किलोमीटर अंतरावर 4 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
टोळी सक्रिय झाल्याची शक्यता
ट्रक चालक आकाश शुदलीचंद राजपूत (23, पळासखेडा, ता.सोयगाव) हे ट्रकमधून किटकनाशक घेवून जयपूर येथून अकोलाकडे साहित्य घेवून जात असताना चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडून 54 हजार रुपये किंमतीचे अदमा कापू मास्टर कंपनीचे तीन बॉक्स, तीन लाख 20 हजार रुपये किंमतीचे अदमा कंपनीचे आठ बॉक्स असा एकूण चार लाख 74 हजार 160 रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चालकाने रावेर पोलिसात मंगळवारी तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.








