मुक्ताईनगर पोलिसांनी रोखली म्हशींची निर्दयतेने वाहतूक : त्रिकुट जाळ्यात


Muktainagar police stopped the brutal transport of buffaloes : trio in the net मुक्ताईनगर : कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने गुरांची ट्रकमधून वाहतूक करताना मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत 13 म्हशींसह एका लहान पिल्लूची सुटका करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई बेलसवाडी गावाजवळ बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
राजेश सुभाष महाजन (35) यांच्या तक्रारीनुसार, बेलसवाडी गावाजवळ ट्रक (आर.जे.37 जि.वी.2371) मधून अत्यंत निदर्यतेने म्हशींची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी कारवाई करीत तीन लाख 28 हजार रुपये किंमतीच्या 13 म्हशींसह एका पिल्लूची सुटका केली तर चार लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला. याप्रकरणी सुरेंद्रर रामूराव जाट (35, सिकर, राजस्थान), हेमाराम चुनारामजी राणा (26, ग्राम, कातर, छोटी तहसील, बादसर, राजस्थान) व मुकेश रामप्रसाद जाधव (48, इंदौर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !