15 हजारांचे लाच प्रकरण : चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर सहाय्यक फौजदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी


15 lakhs bribery Case : Two days police custody for the bribe-taking Assistant Faujdar of Chopra Rural Police Station चोपडा : गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या शुक्रवारी दुपारी चोपडा शहरातील बसस्थसानक परीसरात अटक केली होती. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. संशयिताला शनिवारी जळगाव अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे नेमके लाच प्रकरण
जोयदा, ता.शिरपूर येथील 32 वर्षीय तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून पकडले होते. पोलीस ठाण्यात चला, तुमच्यावर गांजाची कारवाई करायची आहे, अशी दमदाटी करून आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटेच्या सुमारास 30 हजार रुपये उकळले होते व तरुणांची दुचाकी ठेवून घेतली होती तसेच दुचाकी सोडवायची असेल तर 20 हजार रुपये लागतील, अशी मागणी 24 रोजी संशयित शिवाजी बाविस्कर यांनी केली होती व 15 हजार रुपये दिल्यास दुचाकी सोडण्याचे आश्वासन दिले होते. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी 25 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला.







लाच स्वीकारताच अटक
तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे 15 हजारांची लाच रक्कम आणल्यानंतर चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ संशयित शिवाजी बाविस्कर आल्यानंतर त्यास लाच देण्यात आली व पथकाला लाच दिल्याचा इशारा करताच पथकाने संशयितावर झडप घालून त्यास अटक केली. संशयिताविरोधात चोपडा शहर पोलिसात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !