जळगावातील लेडी डॉनसह पाच जणांची टोळी जिल्ह्यातून चले जाव : पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हेगार हादरले


A gang of five including a lady don from Jalgaon should leave the district: Superintendent of Police orders the criminals shaken जळगाव : टोळीने गुन्हे करणार्‍या लेडी डॉनसह पाच जणांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगार हादरले आहेत.

या संशयितांना जिल्ह्यातून केले हद्दपार
भावना जवाहरलाल लोढा (38, रा.अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख), अनिल रमेश चौधरी (40, टोळी सदस्य, रा.अयोध्यानगर, जळगाव), सैय्यद सर्जील सैय्यद हारुन (26 टोळी सदस्य रा.मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (26 रा.मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (34, रा.तांबापुरा, जळगाव, जि.जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्थानक, जामनेर पोलीस स्थानक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानक, पहुर पोलीस स्थानक, चाळीसगाव शहर पोलीस स्थानक, नशिराबाद पोलीस स्थानक व चाळीसगाव रेल्वे पोलीस स्थानकात एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल असल्याने टोळीला हद्दपार करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव यांनी प्रस्ताव तयार केला.







पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने खळबळ
जा टोळीने जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरविण्याने टोळीची नागरीकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांना जळगाव जिल्ह्यात शांतता ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे, असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, चालक इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे सादर केला होता.

जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाची चौकशीअंती सर्व गुन्हेगारांना एक वर्षाकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतून हद्दपार केले. हद्दपार प्रस्तावावर स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांनी व त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, सुनील पंडीत दामोदरे यांनी काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !