जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी प्रकरणी अट्टल गुन्हेगार जाळ्यात


Major operation of Jalgaon MIDC Police : In the case of house burglary, the unshakable criminal is in the net जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी प्रकरणी अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. तांबापूरा परीसरातील राहणार्‍या वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबवल्याप्रकरणी सुरत येथून संशयीताला अटक करण्यात आली तर 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील तांबापूा परीसरात तसलीमबी मोहम्मद सैय्यद (60) या बकरीईदच्या निमित्ताने 26 जून ते 7 जुलै दरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या असता चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 48 हजारांचा मु्देमाल लांबविला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी संयशित आरोपी इश्तियाक अली राजीक अली याला सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (55, रा. तांबापूरा) , अनिस हमीद शेख (31) आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडून 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.







यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !