जळगावातील अट्टल चैन चोरटे एरंडोल पोलिसांच्या जाळ्यात

धूम स्टाईल चैन चोरल्याची कबुली : शंभर टक्के मुद्देमालही जप्त


Attal chain thieves in Jalgaon caught by Erandol police एरंडोल : धूम स्टाईल चैन चोरी करणार्‍या जळगावातील दोघा भामट्यांनी एरंडोल पोलिसांनी गजाआड करीत दोन गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. सय्यद तोशीब तय्यब अली (24, पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश राजू खरे (20, दूध फेडरेशन, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एरंडोल शहरातील विमलबाई लक्ष्मण चौधरी यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना 24 ऑग्स्ट रोजी घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी चोरटे हे चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, मिलिंद कुमावत, अकिल मुजावर आदींनी चाळीसगाव येथे जाऊन आरोपींना पाठलाग करीत अटक केली.आरोपींकडून 18 ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली हस्तगत करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !