कानबाई उत्सवासाठी आलेल्या विवाहितेचा शॉक लागून मृत्यू : गंगापुरीत शोककळा


Shocked death of married woman who came for Kanbai Utsav : Mourning in Gangapuri धरणगाव : खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या विवाहितेचा विद्युत वजन काट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. भारती घनश्याम पाटील (रा.गंगापुरी, ता.धरणगाव, असे मयत विवाहितेचे नाव आहे.

उत्सवासाठी गावी परतला परीवार
घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी चार वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परीवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी, काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणार्‍या संगीता संजय पाटील यांनी घरात जावून पाहीले असता भारती पाटील ह्या जमिनीवर पडलेल्या होत्या. त्यांनी देखील आरोळ्या मारल्यानंतर काहीजण आले व पाहिीले असता भारती पाटील यांच्या हातात ईलेक्ट्रीक वजन काट्याची ईलेक्ट्रीक पीन होती. विजेय्या धक्क्यामुळे भारती पाटील ह्या बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले.







गावकर्‍यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालादार ईश्वर शिंदे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !