जळगाव जिल्ह्यात एक लाख 22 हजार 872 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध

शेतकर्‍यांनी खतांचा साठा न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


One lakh 22 thousand 872 metric tonnes of fertilizer stock available in Jalgaon district जळगाव : जिल्ह्यात सध्या खतांचा 1 लाख 22 हजार 872 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा 22 हजार 132 मेट्रिक टन साठा आहे. पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा 5200 मेट्रिक टन युरीया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकर्‍यांनी खते भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे

डीपीडीसीत उपस्थित झाला होता मुद्दा
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत युरिया खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच खत उपलब्धतेचा आढावा घेऊन युरिया खताचे पुर्नवितरण करण्याच्या कृषी विभाग व जिल्हा परिषद विभागास सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खतांचे पुर्नवितरण करण्यात आले आहे.







खतांचा साठा न करण्याचे आवाहन
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आवश्यकते प्रमाणे दरमहा पुरवठा करण्यात येत असतो. जिल्ह्यात आज रोजी 2 लाख 43 हजार 103 मे. टन खतांचा पुरवठा करण्यात आलेला असुन मुख्य खत युरियाचा 76 हजार 699 मे.टन पुरवठा झालेला आहे. 22 ऑगस्ट रोजी आरसीएफ कंपनीमार्फत 3000 मे.टन व एनएफएल कंपनीचा 2600 मे.टन युरिया पुरवठा करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात इफ्को कंपनीचा 2600 मे.टन युरीया खताचा व कृभको कंपनीचा 2600 मे.टन युरिया खतांच्या पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खत भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. युरीया, एसएसपी व पोटॅश या मुलभूत खतांचा वापर करुन देखील घरच्या घरी मिश्र खते बनवता येतील. बियाणे व खत खरेदी करतांना जिल्ह्यातील अधिकृत वितरक यांचेकडूनच खरेदी करावे. विक्रेत्यांकडून बील अवश्य घ्यावे. असे आवाहन ही ठाकूर व जगताप यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !