अॅड.रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड
Adv.Rohini Khadse has been elected as Nationalist Congress Women’s Aghadi Regional President मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी अॅड.रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार, 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अॅड.रोहिणी खडसे यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले. पक्ष नेतृत्वाने आता अॅड.रोहिणी यांच्यावर मोठी जवाबदारी टाकल्यानंतर महिला कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.
यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार नवाब मलिक, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

जवाबदारी वाढली
अॅड.रोहिणी खडसे यांनी माजी मंत्री खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना मोठी जवाबदारी मिळणार असल्याचे संकेत होते मात्र अजित पवार हे भाजपासोबत गेल्यानंतर ही चर्चा मागे पडली मात्र आता अॅड.रोहिणी यांनी नव्याने जवाबदारी मिळाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. अॅड.रोहिणी या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत असून त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. पक्षातील विविध आंदोलने व उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असल्याने त्यांचे पक्ष कार्य आणि संघटन कौशल्य बघुन पक्षाने त्यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
