पाचोरा तालुक्याील 24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : मुलाला ठार मारण्याची धमकी


24-year-old married woman of Pachora taluka assaulted : Threatened to kill child पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला तसेच विवाहितेच्या लहान मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. विवाहितेने प्रतिकार केल्यानंतर तिला विळा मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात महेंद्र गोविंद गुजर (पुनगाव, ता.पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे अत्याचार प्रकरण
पाचोरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात 24 वर्षीय विवाहिता मुलासह नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते 29 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडीतेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गोविंद गुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !