ओझरच्या तरुणाची विषारी औषध सेवन करीत आत्महत्या
Ozar’s youth commits suicide by consuming poisonous medicine जळगाव : विषारी औषध सेवन केलेल्या ओझर येथील तरूणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हर्षल गजानन चौधरी (25, ओझर, ता.जामनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील ओझर येथे हर्षल गजानन चौधरी (25) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी त्याने विषारी औषध घेतले होते. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, त्याने विषारी औषध घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी 4 वाजून 20 मिनीटांनी तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर झिरो ही नोंद जामनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पुढील तपास हवालदार मुकुंदा पाटील करीत आहे








