तलवारींच्या धाकावर दहशत : मोहाडीतील संशयित एलसीबीच्या जाळ्यात
Terror at the threat of swords : Suspects in Mohadi in LCB’s net जळगाव : तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या मोहाडीतील संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. हर्षल विनोद राजपूत असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.







गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, अशोक पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली.


