चोरीच्या 16 दुचाकींसह पाचोरा व एरंडोल तालुक्यातील चौकडी जाळ्यात

जळगाव एलसीबीची दमदार कामगिरी : मुख्य म्होरक्या पसार


Four in Pachora and Erandol taluka nabbed with 16 stolen bikes जळगाव : पाचोरासह एरंडोल तालुक्यातील अट्टल दुचाकी चोरट्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 16 दुचाकी जप्त केल्या आहेत तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बुलढाणा, अकोला, अहमदनगर व गुजरात राज्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. अटकेतील चार आरोपींना अधिक तपासाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मुख्य म्होरक्या संतोष इंगोले (अकोला) हा पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकाने एरंडोल तालुक्यातील पिंप्रीसीम येथील सुनील भिल यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे निष्पन्न केल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने इतर चोरीच्या तीन दुचाकी काढून दिल्या. त्यानंतर ह्या दुचाकी एरंडोल तालुक्यातील नागदुली या गावातील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून विना कागदपत्राच्या आधारे कमी किंमतीत विकत घेतल्याचे सांगताच खुशाल पाटील आणि गोविंदा कोळी यांना ताब्यात घेतल्यानंतर अजून एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. सुनील भिल याची अजून चौकशी केली असता तपासात पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. दरम्यान या सर्व दुचाकी संतोष इंगोले (रा. अकोला) याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरून या चौघांकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. चौघांकडून सात लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 16 दुचाकी हस्तगत केल्या.

चारही आरोपी अट्टल आरोपी
सुनील शामराव भील (35, पिंप्रीसिम, ता.एरंडोल), खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (20), गोविंदा अभिमन्यू कोळी (45, दोन्ही रा.नागदुली, ता.एरंडोल)आणि हर्षल विनोद कोळी (20, मोहाडी, ता.पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव एलसीबीची दमदार कामगिरी ः मुख्य म्होरक्या पसारस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चोबे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल चौधरी, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !