भुसावळात भाजपा तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष निवडीसाठी मुलाखती
Interviews with BJP taluka presidents for city president election in Bhusawal भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या भुसावळ तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रियेबाबत पुंडलिक बर्हाटे विद्यालयात इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या. शहराध्यक्ष पदासाठी 12 तर तालुकाप्रमुख पदासाठी 11 इच्छूकांनी मुलाखती दिल्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर जळगाव जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी नंदकिशोर महाजन, भाजपा भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष भालचंद पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, अलका शेळके, तालुकाध्यक्ष मनीषा पाटील आदी व्यापीठावर उपस्थित होते. याप्रसंगी या निवड प्रक्रियेबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी उपस्थित भुसावळ तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षपदासाठीचे आवश्यक असलेला एक फॉर्म त्या ठिकाणी सर्वांकडून भरून घेतला. त्यानंतर भुसावळ ग्रामीण भागातून अध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकन त्या ठिकाणी आले. तर शहरी भागातून एकूण 12 इच्छुक उमेदवारांची अर्ज आलेत. त्यानंतर संबंधित कोर कमिटीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आणि मुलाखती घेऊन अध्यक्षपदाची निवड वरिष्ठ नेत्यांना अहवाल सादर करून निर्णय 15 दिवसानंतर जाहीर करण्यात येईल सांगण्यात आले.

या इच्छूकांनी दिल्या मुलाखती
भुसावळ शहर पदासाठी गिरीश महाजन, शिशिर जावळे, किसन गोवर, कैलास शेलोडे, शेखर इंगळे , युवराज लोणारी यांच्यासह एकूण 12 उमेदवारांनी शहराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या तर ग्रामीण भागातून प्रशांत पाटील, चंद्रशेखर पाटील, भालचंद्र पाटील यांच्यासह एकूण 11 इच्छुकांनी त्याठिकाणी मुलाखती दिल्या.
