क्लासवरून बहिण घरी येताच बसला धक्का : 20 वर्षीय भावाने उचलले टोकाचे पाऊल
Shocked when sister came home from class : 20-year-old brother took extreme step जळगाव : घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मयुर कॉलनीत घडली. क्लासमधून आलेल्या बहिणीने घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिने हंबरडा फोडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुर्गेश भरत बारी (20, मयूर कॉलनी, पिंप्राळा परीसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
घरी कुणी नसताना उचलले पाऊल
दुर्गेश भरत बारी हा तरुण पिंप्राळा परीसरातील मयुर कॉलनीत वास्तव्याला होता. त्याचे वडील भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी रीक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेशचे वडील कामावर निघून गेले. त्याची आई कविता ह्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर बहिण नंदीनी ही क्लासला गेली होती. त्यावेळी दुर्गेस हा घरी एकटाच होता. दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.






भावाचा मृतदेह पाहताच बसला धक्का
दुपारी एक वाजता बहिण नंदिनी ही क्लासमधून घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोकून आवाज दिला. परंतू आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणार्या नागरीकांच्या मदतीने दरवाजा उघडला तर दुर्गेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. भावाला पाहताच बहिण नंदिनी हंबरडा फोडला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामांनद नगर पेालीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.


