भुसावळात परप्रांतीय प्रवाशाचा मोबाईल लांबवणारा अट्टल भामटा जाळ्यात

57 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त : चोर्‍या उघडकीय येणार


Attal Bhamta, who stole the mobile phone of a foreign traveler in Bhusawal, is in the net भुसावळ : रेल्वेच्या मुसाफीर खान्यात झोपलेल्या परप्रांतीय प्रवाशाचा मोबाईल लांबवणार्‍या शहरातील भामट्याच्या रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताकडून 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याशिवाय इतर चार 57 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आल्यानेआणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे. पिंटू अशोक तोडकर (22, भारत नगर, झोपडपट्टी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्रवासी झोपताच साधली संधी
सुशील कुमार रामचरण धुर्व (22, चाकण, पुणे, मूळ रा.छत्तीसगड) यांना 31 ऑगस्ट 2023 गोवा एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आले व त्यांना राजनांदगाव जावयाचे असल्याने तसेच ट्रेन उशिराने असल्याने त्यांनी बुकींग कार्यालयाजवळील मुसाफीर खान्यात अंग टाकल्याने त्यांना झोप लागली व ही संधी साधून चोरट्यांनी 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भुसावळ लोहमार्ग निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजीत तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, बाबू मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे तर्डे व आरक्षक दीपक शिरसाठ यांनी संशयिताला अटक केली. तपास हवालदार श्रीकृष्ण निकम करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !