घरगुती गॅसचे अवैध रिफिलिंग : जळगावातील कारवाईने उडाली खळबळ


Illegal refilling of domestic gas: The action in Jalgaon caused a stir जळगाव  शहरातील जोशीपेठ येथील बागवान मोहल्यात घरगुती गॅसचा काळाबाजार त्याचे अवैधरीत्या वाहनात अवैधरीत्या रीफिलिंग करताना शनिपेठ पोलिसांनी एकावर कारवाई केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 20 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीपेठ मधील बागवान मोहल्यात अबरार अश्फाक बागवान (23, रा. तांबापुरा, जळगाव) हा तरुण घरगुती गॅसचा गैरवापर करून त्याची चोरटी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवार 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पथकाने कारवाई करत संशयित आरोपी अबरार अशपाक बागवान (व23, रा. तांबापुरा जळगाव) यांच्याकडून गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे साहित्य इलेक्ट्रिक पंप आदी साहित्य असा एकूण 20 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.







कारवाईने उडाली खळबळ
या संदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अबरार अशपाक बागवान याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !