विजेच्या धक्क्याने सफाई कर्मचार्‍याचा मृत्यू : नशिराबादच्या शेतकर्‍याविरोधात गुन्हा


Death of sweeper due to electric shock : Crime against Nashirabad farmer जळगाव : साफसफाई करीत असतांना विजेचा शॉक लागून विशाल गोपी चिरावंडे (25, मूळ रा.धानोदा, ता.चोपडा, ह.मु.भवानी नगर, नशिराबाद) या सफाई कर्मचार्‍याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास नशिराबाद येथे घडली होती. याप्रकरणी विनोद प्रेमचंद चिरावंडे (नशिराबाद) यांच्या तक्रारीवरून शेतकरी सोपान विठोबा वाणी (खालची अळी, नशिराबाद) या शेतकर्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने कामगाराचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील नशिराबाद विशाल गोपी चिरावंडे हा तरूण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त झाला आहे. नेहमीप्रमाणे विशाल चिरावंडे हा मंगळवारी सकाळी आठ वाजता नशिराबाद गावाजवळील सोपान विठोबा वाणी याने दिलीप शांताराम कुलकर्णी यांच्या शेतात सफाई करीत असताना त्यास विद्युत शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्याला उचलून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, वाणी यांनी शेताच्या कुंपणाला तारेच्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत कामगाराच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी व दोन मुली असा परीवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !