पारोळ्यातील सायकलस्वाराचा कारच्या धडकेने मृत्यू : संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको


Cyclist dies after being hit by a car in Parola : Angry villagers block the road पारोळा : भरधाव कारने सायकलस्वाराला जबर धडक दिल्याने पारोळ्यातील सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरीकांनी काही वेळ महामार्ग रोखून धरला. अजय शामराव शिंदे (35, शिवाजी विभाग, हत्ती गल्ली, पारोळा) असे मयत तरूणाचे नाव आहे. अपघातप्रकरणी कार चालक हनीफ कतुबुद्दीन शेख (34, धुळे) याच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

अपघातानंतर नागरीक संतप्त
पारोळा शहरातून गेलेल्या बायपास राष्ट्रीय महामार्गावरून शिवाजी मराठे हे धरणगाव चौफुली रस्ता ओलांडून घरी जाण्यासाठी सायकलने जात असताना धुळ्याच्या दिशेने भरधाव कार क्रमांक (एम.एच.18 बी.सी.9077) ने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली व या धडकेत सायकलस्वार शिवाजी मराठे हे 15 ते 20 फुट अंतरावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडला. पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह कुटीर रूग्णालयात हलविण्यात आला.







दरम्यान, अपघात घडल्यानंतर संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी महामार्गावरच रास्ता रोको केला. अपघातप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कार चालक हनीफ कतुबुद्दीन शेख (34, धुळे) याच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली तर बुधवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !