जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह दोघांची पोलीस कोठडीत रवानगी
District Manager of Vasantrao Naik Bhatke Vimukt Caste Corporation of Jalgaon along with two sent to police custody जळगाव : शेळी पालनासाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भीभमराव लहू नाईक (55) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (34) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली होती. लाचखोरांना बुधवारी जळगाव सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
बोरावल, ता.यावल येथील 42 वर्षीय तक्रारदाराने जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे शेळी पालन साठी एक लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता 75 हजार रुपयांचा मंजूर झाला व उर्वरीत 25 हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच सोमवारी मागितल्यानंतर तक्रारीअंती कारवाई करण्यात आली होती. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे करीत आहेत.








