पाचोरा शहरातील तरुणीची सोशल मिडीयावर बदनामी : एकाविरोधात गुन्हा
Defamation of young woman in Pachora city on social media: Crime against one पाचोरा : शहरातील एका भागात राहणार्या 19 वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करीत आक्षेपार्ह फोटोद्वारे बदनामी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चातेधारकाचा कसून शोध
19 वर्षीय तरुणी ही पाचोरा शहरातील एका भागात वास्तव्याला आहे, अज्ञात व्यक्तीने 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्रामचे दोन बनावट खाते तयार करून पीडित तरुणीचा फोटो ठेवून त्यावर अश्लील स्टिकर लावले. त्यानंतर तिची बदनामी होईल या उद्देशाने सोशल मीडियात व्हायरल केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने सुरुवातीला हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित तरूणीसह तिच्या नातेवाईकांनी बुधवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते बनविणार्या अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे








