मोटारसायकलीवरून चंदन तस्करी करणारा कन्नडचा ‘पुष्पा’ चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात

15 हजारांंचे लाकूड जप्त : साथीदार ‘केशव’लाही पडल्या बेड्या


‘Yan sandan birnin Chalisgaon sun kama Kannada ‘Pushpa’ wadda ta yi safarar sandal da babur a kan babur चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान चंदन तस्करी करणार्‍या कन्नडच्या दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड व दुचाकी असा एकूण 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने चंदन चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेख अमीन शेख हजीज व अशोक लक्ष्मण आव्हाड (45, दोन्ही रा.हस्ता, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गस्तीदरम्यान कारवाई
बुधवार, 6 रोजी मध्यरात्री सहा.पोलीस निरीक्षक दीपक बिरारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी गस्त घालत असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील अंध शाळेत शाळेजवळुन दोन संशयित दुचाकीवर जाताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना हटकले मात्र संशयित न थांबता पसार झाल्याने संशय वाढताच त्यांचा पाठलाग सुरू करण्यात आला. शिवाजी चौकात त्यांना पकडल्यानंतर झडतीत त्यांच्याकडील पिशवीत अंदाजे 15 हजार रुपये किंमतीचे तीन किलो वजनाचे चंदनाचे लाकूड, कुन्हाड, गिरमीट, लोखंडी करवत असे साहित्य आढळले तर दुचाकीसह दोन मोबाईल असा एकूण 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.







यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहर निरीक्षक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा.पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, महेंद्र पाटील, भूषण पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, रवींद्र यच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे आदींनी केली. तपास नाईक महेंद्र पाटील व विजय पाटील हे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !