चाळीसगावात गोवंश कत्तलीसाठी जाणार्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; चार गोवंशाची सुटका
Two people who were going for cow slaughter in Chalisgaon were shackled by the police; Rescue of four cows चाळीसगाव : शहर पोलिसांनी गोवंशी कत्तलीसाठी जाणार्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. शेख अनिस शेख गफुर कुरेशी (48, उर्दू बालवाडीच्या पाठीमागे, मोहम्मदीया मशीदसमोर ईस्लामपुरा, चाळीसगाव) व मुस्ताक खान हारुण खान कसाई (40, अमोल बुट हाउसच्या बाजुला रथगल्ली, कसाईवाडा, चाळीसगाव) अशीअटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडील लहान लाकडी दांड्याची लोखंडी धारदार कुर्हाड, दोन लोखंडी धारदार सुरे व धार लावण्याची गोलाकार लांब कानस जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींच्या कबुली जवाबानंतर 45 हजार रुपये किंमतीची चार गोवंशी जनावरेही जप्त करण्यात आली.
गस्तीदरम्यान कारवाई
चाळीसगंव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना चाळीसगांव शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परीसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याचा संशय असल्याने त्यांनी गस्त कडक केली होती. शुक्रवारी पहाटे चार वाजता पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, महेंद्र पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर यांना चाळीसगांव शहरातील सदानंद हॉटेल जवळ दोन संशयीतांच्या दुचाकीवरील हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला मात्र संशयीत पसार झाल्याने त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांना पकडण्यात यश आले.








