भुसावळाच्या डीआरएम ईती पांडे यांनी केले जळगाव स्थानकाचे निरीक्षण


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाातील जळगाव रेल्वे स्थानकाची पहाणी डीआरएम ईती पांडे यांनी रविवारी केली. रेल्वे स्थानकावरील सुधारणा करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्यात. यावेळी विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्या समवेत होते.

प्रवासी सुविधांची केली पाहणी
जळगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षक डीआरएम ईती पांडे यांनी केले. निरीक्षण करतांना त्यांनी रेल्वे स्टेशनचा परिसर, पार्सल कार्यालय, बुकींग ऑफिस, स्टेशन, प्लॅटफॉर्म यांची पहाणी केली. प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सुविधा त्यांना मिळत आहे का नाही, याची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्टेशनच्या परिसरात आवश्यकठठिकाणी सुविधा तसेच सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी सोबत असलेल्या अधिकार्‍यांना दिल्यात. यावेळी विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित हाोते. डीआरएम पांडे या विभागातील विविध रेल्वे स्थानकांना भेट देऊन त्यांची पहाणी करीत आहे. कुठे सुधारणा करायची, कुठे प्रवाशांना सुविधा मिळत नाही याची माहिती घेत अधिकार्‍यांना सूचना करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !