संपत्तीचा वाद जीवावर : पित्याकडून मुलाची हत्या


अकोला : संपत्तीच्या वादातून पित्याने आपल्या मुलाची गोळी झाडत हत्या केल्याची घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेत मनीष भारती याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी त्याचे वडील बाबा भारती यास पोलिसांनी अटक केली आहे. बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यात संपत्तीवरूनवाद सुरू होता. त्यातच मुलाने शस्त्र घरी आणल्यानंतर बाबा भारती यांनी बचावार्थ सोबतच्या बंदुकीतून गोळी झाडल्याने मुलगा मनीष हा ठार झाला. बाबा भारती हे काँग्रेसचे नेते असून मनीष भारती यास तीन महिन्यासाठी दोन दिवसांपूर्वीच हद्दपार करण्यात आल्याची माहितीदेखील आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !