शंभर ब्रास अवैध गौण खनिजाचा साठा जप्त

अंजाळेजवळ तहसीलदारांच्या पथकाची कारवाई


100 brass of illegal secondary mineral stock confiscated यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या काठी विविध ठिकाणी ठिकाणी अवैधरीत्या साठवण करून ठेवण्यात आलेला सुमारे 100 ब्रासहून अधिकचा गौण खनिजाचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बेवारसरीत्या चोरीच्या उद्देशाने साठवण करून ठेवलेला दगड, गोटे व डबरचा हा साठा तहसीलदारांच्या पथकाने हस्तगत केला असून या साठ्याची प्रशासकीय पातळीवरील कारवाई पूर्ण करून लिलाव केला जाणार आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि साठा करणार्‍यांमध्ये खळबड उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अंजाळे, ता.यावल या गावाजवळील तापी नदीच्या काठी गट क्रमांक 588, गट क्रमांक 564/1 आणि 552 मध्ये अवैधरीत्या दगड, गोठे, डबर अर्थात गौण खनिज अवैधपणे साठवून ठेवले होते. याबाबतची गोपनीय माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे सुमारे 100 ब्रास होऊन अधिकचा अवैध गौण खनिजाचा साठा जप्त बेवारस म्हणून जप्त केला. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळाधिकारी सचिन जगताप, मीना तडवी, बबीता चौधरी, तलाठी एस.व्ही. सूर्यवंशी, टी.सी.बारेला, तेजस पाटील, अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली.



असा मिळाला साठा
तापी नदीच्या काठी अंजाळे गावाच्या शिवारात गट क्रमांक 588 मध्ये अंदाजे 15 ब्रास दगड, गोटे व डबरचा साठा मिळाला तर गट क्रमांक 564/1 आणि 552 मध्ये सुमारे 90 ब्रास असा एकूण समारे 115 ब्रास अवैद्य गौणखनिज साठा आढळला असून तो जप्त करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !