मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले !


Minister Chhagan Bhujbal’s big secret explosion: It was decided at Sharad Pawar’s house that he would go to BJP under the leadership of Supriya Sule!
मुंबई :
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते, त्यानंतर पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी करून खळबळ उडवून दिली.

अशा चुका मी पण खूप केल्या : मंत्री भुजबळ
येवला इथं शरद पवार यांनी भर सभेत भुजबळांना तिकीट देऊन चूक केल्याचे सांगत जनतेची माफी मागण्यासाठी येथे आल्याचे म्हटले होते. पवार यावेळी म्हणाले होते की, माझा अंदाज फारसा चूकत नाही, परंतु इथं माझा अंदाज चुकला. या टिकेनंतर भुजबळांनी पलटवार करताना सांगितले की, चुकलो म्हणजे काय, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता असताना मी तुमच्यासोबत आलो, तेव्हा कुणी तुमच्याबरोबर नव्हते. मी मजबुतीने उभा राहिलो. मी सांगू का माझी चूक झाली, अशा चूका मीपण खूप केल्या.

सुप्रीया सुळेंना अध्यक्ष करण्याबाबत झाला होता निर्णय
शरद पवार भाजपासोबत जाणार नव्हते, परंतु मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवतो, त्यानंतर तुम्हाला हवं ते करा हे बोलले, हे खरे आहे परंतु पुढे 15 दिवस घरात चर्चा झाली. ही अजितदादांची माहिती आहे. शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यांनी राजीनामा दिला तर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करायचे. त्यानंतर आपण भाजपासोबत सरकारमध्ये जायचे हे शरद पवारांच्या घरी ठरले होते व अचानक त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राजीनामा दिला होता असं भुजबळ टीव्ही 9 च्या मुलाखतीत म्हणाले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !