दहा दिवसात आरक्षण द्या अन्यथा…. मनोज जरांगे पाटलांनी दिला सरकारला गंभीर ईशारा


अंतरवली सराटी : दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजययात्रा निघेल, असा इशारा मनोज जरांगे पाटल यांनी राज्यातील शिंदे सरकारला दिला. शनिवारी अंतरवली सराटीत आज मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला होता.

सरकारला दिला इशारा
10 दिवसात आरक्षण मिळालेले नाही तर पुढेही आंदोलन शांततेत होणार पण पुढील आंदोलनाची दिशा 22 ऑक्टोबरला ठरवणार आणि पुन्हा एकदा शांततेत आंदोलन करत असताना आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरी शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढील भूमिका ठरवू. मराठा समाज शांत आहे. मायबाप समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केलं म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो. मराठा समाज एक होत नाही, असे बोलणार्‍यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्कटात हाणली, असा टोला त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !