चाळीसगावातील निवासी शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट : भोजन ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

तक्रारीची दखल : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला पंचसूत्री कार्यक्रम : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारासाठीच्या उपक्रमांसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर


चाळीसगाव : आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला अचानक भेट देत तेथे विद्यार्थ्यांना मिळत असलेले निकृष्ट जेवण व विद्यार्थ्यांची ढासळलेल्या गुणवत्तेची बाब उघडकीस आणून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. याची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मंत्री अनिल पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेच्या अनुषंगाने पंचसूत्री कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात केवळ चाळीसगाव निवासी शाळाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळा वस्तीगृहे येथे पुढील काळात तो राबविला जाणार आहे. त्यात विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यासाठी दहा लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार आहे. .

प्रत्येक शाळेची गुणवत्ता तपासणार
जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता प्रगती तपासण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे, दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे यासाठी देखील विशेष उपाययोजना राबवून त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक भविष्यावर परिणाम करणार्‍या महत्वाच्या बाबींकडे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लक्ष वेधल्याने केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमांनी देखील याची याची विशेष दखल घेतली तसेच समाज माध्यमे, फेसबुक, युट्युब यावर देखील याबाबत चर्चा होऊन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कृतीचे कौतुक करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !