माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप ; जाणून घ्या नेमकी बातमी


Serious allegations against Ajit Pawar from the book ‘Madam Commissioner’ by former Police Commissioner Meera Borvankar; Know the exact news पुणे : माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकातून सरकारी जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचा डाव तत्कालीन पालकमंत्र्यांचा होता , असा गौप्यस्फोट करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री हे आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याने दादांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. बोरवणकर यांच्या सरकारी जमिनीचा लिलाव करून ती खासगी व्यक्तीला देण्यासाठी पालकमंत्री दादा यांचा आग्रह असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.

जाणून घ्या नेमकी काय म्हटलंय पुस्तकात
पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बोरवणकर यांना विभागीय आयुक्तांनी फोन आला. येरवडा जमीन संदर्भात पालकमंत्री चर्चा करणार आहेत, असे कळवण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परीसराचा नकाशा होता.

पालकमंत्र्यांचा जमीन विकण्यासाठी आग्रह
या भेटीत पालकमंत्र्यांनी संबंधित जागेचा लिलाव झालेला असून जास्त बोली लावणार्‍यासोबत तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी असं म्हटलं. परंतु मी येरवडा हे मध्यवर्ती ठिकाण असून अशी जागा पुन्हा पोलिसांना मिळणार नाही. त्याशिवाय कार्यालय, पोलिस वसाहती यासाठी या जागेची गरज भासेल. असं मी त्यांना म्हटलं. सोबतच मी आत्ताच कारभार घेतल्यानंतर सरकारी जमीन खाजगी व्यक्तीला दिल्याचा आरोप माझ्यावर होईल. परंतु त्या मंत्र्यांनी काही न ऐकता जमीन लिलावाचा आग्रह कायम ठेवला. यानंतरही मी हे करण्यास नकार दिला तेव्हा समोरच्या मंत्र्यांनी त्यांच्या हातातील नकाशा टेबलावर भिरकवून दिला, असा गौप्यस्फोट मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

ज्या खासगी व्यक्तीला ही जमीन दिली गेली त्याला सीबीआयने 2 जी घोटाळ्यात आरोपी केले होते. आर.आर.पाटलांनी नेहमी मला पाठिंबा दिला परंतु ते पालकमंत्र्यांच्या दबावाखाली होते ते दिसून आले. मीरा बोरवणकर यांनी 2010 मध्ये पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे पुस्तकात थेट उल्लेख नसला तरी तत्कालीन पालकमंत्री अजितदादा यांच्यावर पुण्याची जबाबदारी होती.

दादा म्हणाले, पालकमंत्र्यांना तो अधिकारच नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. सरकारी जमिनींचा लिलाव करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच जमिनीचा लिलाव होतो, असे ते म्हणाले. या लिलावाला माझाच कडाडून विरोध होता. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !