सोयगाव पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला : तलवारी, पिस्टलासह संशयित जाळ्यात

सहा दरोडेखोरांची टोळी अंधाराचा फायदा घेत पसार : सोयगाव शहरातील घटना


Soygaon Police foil robbery plot : Suspects with swords, pistols in the net सोयगाव : दरोडा घालण्याचा उद्देशाने चारचाकी वाहनाने जाणार्‍या सात दरोडेखोरांना सोयगाव पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पथकांनी रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात रंगेहाथ पकडले मात्र सहा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर एकाला मात्र अटक करण्यात यश आले. संशयिताच्या चारचाकी वाहनातून गावठी पिस्टल, दोन तलवार, मोबाईल व महिंद्रा बोलेरो वाहन मिळून दहा लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशय आल्यावरून कारवाई
सोयगाव शहरातील शिवाजी चौकात रात्रीच्या गस्तीवरील पोलिस पथकाला रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने शहराकडे येताना दिसल्याने पथकाने वाहन क्रमांक (एम.एच.47 ए.3208) अडवले असता वाहनातील सीटखाली दोन पाईप आढळल्याने संशय बळावल्यानंतर संशयिताची विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने संशय बळावला तर पोलिसांनी संशयिताना वाहनाबाहेर येण्याचा इशारा करताच सहा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर एकाला अटक करण्यात यश आले.

शस्त्रसाठा पाहून पोलिसही चक्रावले
बोलेरो वाहनाची तपासणी केली असता एका सीट खाली दोन तलवारी, गावठी कट्टा व मोबाईल आढळल्याने तो जप्त करण्यात आला. पसार दरोडेखोरांच्या शोधासाठी पहाटे पाच पर्यंत शोध मोहिम राबवण्यात आली मात्र संशयित कुठेही आढळले नाहीत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई छत्रपती संभाजी नगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनमोल केदार, जमादार राजू बरडे, अजय कोळी, नारायण जिरी, रवींद्र तायडे, नारायण खोडे, अजय कोळी, विनायक सोनवणे, चालक मिर्झा बेग, संजय सिंगल, गृहरक्षक दलाचे कर्मचार्‍यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !