मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांना जयंतीदिनी अभिवादन


भुसावळ : मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस शहर व परीसरात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.कलाम यांच्या आठवणींना मान्यवरांनी मनोगतातून उजाळा दिला.

आपले परीवार सार्वजनिक वाचनालय, भुसावळ
भुसावळ : आपले परीवार सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व वाचक संवाद अभियान सप्ताहाचे उद्घाटन गोपाळ पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी हेमंत चौधरी होते. वाय.एन.झोपे यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. भुसावळ माध्यमिक पतपेढी संचालकांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने वाचनालयास 15 खुर्च्या भेट दिल्या. जळगाव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष भिरूड यांनी वाचनाल्यास दोन व्हीआयपी खुर्च्या भेट दिल्या. सर्व मान्यवरांचे अशोक चौधरी यांनी हरीपाठ निरूपण हे पुस्तक देऊन स्वागत केले. शैलेंद्र महाजन यांनी आभार मानले. वाचनालयास 17 खुर्च्या मिळाल्यामुळे वाचक चळवळ अधिक बळकट होईल, असा आशावाद शांताराम पाटील यांनी व्यक्त केला.

 

साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, साकळी
यावल : नगरपरषद संचालित, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर, व्ही.टी.नन्नवरे, उपप्राचार्य ए.एस. इंगळे, विद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख एन.के.बारी, ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे, पी.एन.सोनवणे, एन.डी.नेवे, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होत्या. विद्यालयाचे शिक्षक ए.आर.चौधरी, पूनम बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख एस.आर.सोनवणे यांनी केले. त्याचबरोबर विद्यालयात घटस्थापनेनिमित्त शारदामातेची विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांच्याहस्ते स्थापना करण्यात आली.

शारदा विद्या मंदिर, साकळी
साकळी :
शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.महाजन होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे.पवार, बी.ई.महाजन, सदाशीव पी.निळे, किरणकुमार चौधरी, जी.एल.चौधरी, एस.पी.निळे, एन.पी.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. प्राचार्य आर.जे.महाजन यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन एम.ए.महाजन यांनी तर आभार एन.पी.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 15 ऑक्टोबर हा दिवस डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ.रमेश जोशी म्हणाले की, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना विद्यार्थी फार आवडायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे व आपली वाचन क्षमता छंद म्हणून वाढवावी. वाचनाने आपली विचार क्षमता वाढते, तसेच ज्ञानही वाढते, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुस्तकाचे वाचन केले. त्याप्रसंगी सर्व डॉ.सुधीर शर्मा, डॉ.पूनम त्रिवेदी, डॉ.विवेक जोशी, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.हितेश गुप्ता आदी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !