बोदवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे अनावरण
Chhatrapati Shivaraji Maharaj Chowk plaque unveiled in Bodwad city बोदवड : शहरातील मलकापूर चौफुलीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे अनावरण रविवारी करण्यात आले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकासाठी जनसेवक विनोद नामदेवराव पाडर यांचा लढा गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. एक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे नियोजित जागा असा ठराव जनसेवक विनोद पाडर यांनी आत्मदान आंदोलन करून सर्व शिवप्रेमीच्या सहकार्याने नगरपंचायतीत पारीत केला होता.
यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
पुतळा समितीचे जनक किसान एकता संघ दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख जनसेवक विनोद पाडर, कैलास चौधरी, रामदास पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, निवृत्ती ढोले, माजी शिक्षणाधिकारी सुरवाडे, गणेश शर्मा, विजय पाटील, सुनील बोरसे, रवी मराठे, प्रदीप बडगुजर, अजय पाटील, किरण वंजारी, कलीम शेख, दिनेश माळी, गोलू बरडीया, जितेंद्र पाटील, विजय बडगुजर, आनंद गंगतिरे, शांताराम गंगतिरे, प्रवीण जैन धोकाजी, सागर पाटील, विशाल तांगडे, सुरज पाटील व शिवप्रेमी उपस्थित होते.

स्मारकासाठी 6 रोजी मोर्चा
बोदवड नगरपंचायतीने जनसेवक विनोद पाडर यांना आश्वासन दिले होते की येत्या पाच महिन्यांच्या आत आम्ही शिवस्मारकाची जागा मोकळी करून देऊ परंतु 11 महिने उलटून तिथे कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्या कारणाने जनसेवक विनोद पाडर यांनी सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समितीपासून नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे.

