माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकरांचा पुन्हा नीलम गोर्‍हे, मिलिंद नार्वेकरांबाबत धक्कादायक खुलासा


मुंबई : नीलम गोर्‍हे, मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करीत माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत एकदम मस्त पुरावा होता. ज्यावेळी नीलम गोर्‍हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे फार टेक्निकल पुरावा होता. तेव्हा अधिकारीच मला म्हणाले की, मॅडम गुन्हा दाखल करू नका, तुम्हाला मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असे केले तर आपल्याला पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक पद मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

होय ‘त्या’ जागेसाठी अजित पवारांचाच आग्रह
माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर म्हणाल्या की, अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य असलेतरी त्या जागेसाठी अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली व त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलिस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे बोरवणकर यांनी म्हटले.

पुणे पोलिसांना हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनास आणले. आम्ही 3 एकर जागा देणार नाही. त्यामुळे शासनाने आदेश मागे घेतले. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली. पण वाईट वाटले नाही. कारण हा योग्य निर्णय होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !