भुसावळातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार


A young woman in Bhusawal was raped on the lure of marriage भुसावळ : लग्न करण्याचे आमिष दाखवून शहरातील एका भागातील 23 वर्षीय तरुणीवर चार महिने अत्याचार करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवल्यानंतर संशयित उमेर शेख मोहसीन शेख (25, ताज नगर, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
23 वर्षीय पीडीता शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. संशयित उमेश शेख मोहसीन शेख सोबत तिची ओळख झाल्यानंतर संशयिताने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले व 7 नोव्हेंबर 2022 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान संशयिताच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने शनिवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !