भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनने नऊ किलोमीटर धावत जपला भक्तीभाव


भुसावळ  : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवारी नियमितपणे धावण्याचा सराव करतात. या रविवारी सर्व महिला धावपटूंनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून व रविवारी जांभळा रंगाचा टी शर्ट परीधान करून 9 किलोमीटर धावून आपला भक्तिभाव देवीच्या चरणी अर्पण केला. धाव पूर्ण झाल्यानंतर सर्व महिला धावपटूंनी एकरीतरीत्या फोटो काढला. याप्रसंगी गुड्डी देवी, मनीषा सिंग, मंजू शुक्ला, सुनीता वाघमारे, मंगला पाटील, डॉ.चारुलता पाटील, डॉ.निलिमा नेहेते, पुष्पलता चौधरी, संगीता पाटील, किर्ती मोताळकर, माधुरी चौधरी, माया पवार, ज्योती सिंग, ममता ठाकूर, निलांबरी शिंदे, दिपा स्वामी, अर्चना चौधरी, संध्या भोळे, पारुल वर्मा आदींची उपस्थिती होती.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !