भुसावळ नगरपालिकेला जलकुंभ, भुसंपादनातून मिळाली एक कोटी 41 लाखांची भरपाई
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चौफुलीजवळील जलकुंभाच्या जागेचे महामार्ग चौपदरीकरण कामात भूमिसंपादन झाले मात्र पालिकेला भरपाई मिळाली नव्हती. पालिकेला या जागेच्या संपादनापोटी एक कोटी 46 लाख 9 हजार 1 रुपये इतकी भरपाई मिळाली आहे. भूसंंपादन अधिकार्यांनी या रक्कमेचा धनादेश मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना सुपूर्द केला.
अखेर मिळाली भूसंपादनाची रक्कम
नगरपरीषद मालकीच्या सर्वे नंबर 172/2अ मधील पाण्याची टाकी तसेच 175 अ/1/2/2+अ/1/3/1 पैकी मधील 23.10 चौरस मिटर क्षेत्र हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेले होते मात्र पालिकेचा जलकुंभाच्या भूमिसंपादनाची रक्कम मिळाली नव्हती. याबाबत भुसावळ प्रांताधिकारी तथा प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पाठपुरावा करीत ही रक्कम मिळवली. पालिकेला भूसंपादनाच्या मोबदल्यात एकूण एक कोटी 46 लाख 9 हजार 1 रुपये इतकी भरपाई मिळाली आहे. सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) तथा उपविभागीय अधिकारी जिते्ंर पाटील यांनी न रक्कमेचा धनादेश मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना सुपूर्त केला. यावेळी पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



