साकेगाव शिवारातून दुचाकी लांबवली


भुसावळ : साकेगाव शिवारातून चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बोदरसिंह मदनसिंह भिलाला (24, सुक्ता खुर्द, ता.नेपानगर) यांनी साकेगाव शिवारातील हॉटेल वरुणजवळ दुचाकी (एम.पी.12 एन.5423) ही लावली असता चोरट्यांनी मंगळवार, 17 रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान दुचाकी लांबवली. याप्रकरणी याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात भिलाल यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !