रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून 20 लाखांचा दंड वसुल : भुसावळ विभागात धडक कारवाई मोहिम


20 lakh fine from free passengers in railways : Strike action campaign in Bhusawal section भुसावळ : मध्य रेल्वेतून धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट तर काही प्रवासी जनरल तिकीट काढून आरक्षण डब्यातून प्रवास करीत असल्याने शनिवार, 21 रोजी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात आल्यानंतर दोन हजार 623 प्रवाशांकडून 20 लाख 16 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांसह नियमांचे उल्लंघण करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.

कारवाईने उडाली खळबळ
रेल्वे गाड्यांना असलेल्या गर्दीमुळे डीआरएम इती पांडे, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक धिरेद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांवर शनिवार, 21 अचानक तिकीट तपासणी मोहिम सुरू करण्यात आली. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये सुध्दा तिकीट तपासणी करण्यात आल्यानंतर अनेक फुकटे प्रवासी आढळले तसेच जनरल तिकीट काढून आरक्षीत डब्यातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल केला. यावेळी दोन हजार 623 प्रवाशांकडून 20 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या तिकीट तपासणी मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. रेल्वेकडून अश्याच प्रकारची तिकीट तपासणी नियमीत होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !