विद्यार्थ्यांनी तत्काळ मतदारनोंदणी करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा- प्रांताधिकारी कडलग


फैजपूर : फैजपूर येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयामध्ये तहसील कार्यालय यावलच्या वतीने मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

नोंदणीत प्रांताधिकारी कैलास कडलग, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक अधिकारी रशीद तडवी प्राचार्य डॉ अनिल भंगाळे, युवा नेते धनंजय चौधरी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या शिबिरात 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थी जे नवमतदार आहेत त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यांना मतदार नोंदणी होऊन निवडणूक आयोगाकडून मतदान कार्ड घरपोच मिळाले आहे. त्या नोंदणी झालेल्या नवीन मतदान कार्ड प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याहस्ते विद्यार्थिनी दिशा नंदकिशोर अग्रवाल यांना देण्यात आले. मतदान कार्ड पूर्णता रंगीत व डिजिटल असून त्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे. यावेळी तापी परीसर विद्या मंडळ, फैजपूर सदस्य संजय काशिनाथ चौधरी, प्राचार्य डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ.विलास बोरोले, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ.विजय सोनजे, विद्यार्थी विकास अधिकारी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी व आपल्या मतदानाचा हक्क बजवाव, असे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !